बीडमधील ओबीसी समाज आक्रमक; आंबेजोगाई- परळी महामार्गावर ओबीसींचं आंदोलन

बीडमधील ओबीसी समाज आक्रमक; आंबेजोगाई- परळी महामार्गावर ओबीसींचं आंदोलन

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

याच पार्श्वभूमीवर बीडमधील ओबीसी समाज आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. आंबेजोगाई- परळी महामार्गावर ओबीसींनी आंदोलन केलं आहे.

यावेळी टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून या आंदोलनामुळे परळी अंबाजोगाई महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com