Beed Special Report : लग्नाचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा; बीडमध्ये लगीनगाठ की फसवणुकीचा घाट?
हल्लीच्या काळात अनेक मुलं वयात आलेली आहेत. मात्र मुली मिळत नसल्याने त्यांची लग्न खोळंबली आहेत. हाच धागा पकडत महाराष्ट्रात एक टोळी सक्रिय झालीय. ही टोळी मुलाच्या कुटुंबाशी संपर्क साधते आणि मुलासाठी मुलगी शोधून देतो, असे आमिष दाखवते. इतकंच काय तर लग्नासाठी मुलगी उभी केली जाते. एकदा का लग्न झालं की, अवघ्या दोन ते तीन दिवसांत पोबारा केला जातो. पाहूयात, ही टोळी नेमकी फसवते कशी? हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट
लग्न लाऊन फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
लग्न करून सोनं-पैसे घेऊन 'नवरी'चा पोबारा
अनेक लग्नाळू मुलांना लाखोंचा गंडा
महाराष्ट्रात अनेक तरूण सध्या लग्नाच्या वयाचे झाले आहेत... त्यातच मुलींची संख्या कमी असल्याने अनेक तरुणांची लग्न खोळंबली आहेत... मात्र बीड जिल्ह्यात अशाच तरुणांना लग्नाचं आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. या टोळीची मोडस ऑपरेंडी कशी आहे पाहा.
लगीनगाठ की फसवणुकीचा घाट?
वयात आलेल्या मुलांची माहिती घेऊन हेरायचं
कुटुंबाशी संपर्क करून लग्नाचं आमिष दाखवायचं
धुमधडाक्यात लग्न लावून डोळ्यात धूळफेक करायची
लग्न झालं की दोन-तीन दिवसांत सोनं-पैसे घेऊन पोबारा करायचा
मुलाचं लग्न लावून देतो, मुलगीही शोधून देतो, असं सांगत एक ते दीड लाखापासून ते 25 लाखापर्यंत फी म्हणून पैसे घेतले जातायत. त्यामुळे अनेक मुलांची आणि कुटुंबाची फसवणूक झालीय. खरंतर, आपल्या मुलाचे दोनाचे चार हात करावेत, आणि त्याने संसार थाटावा. असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं... मात्र मुली मिळत नाहीत म्हणून अनेक तरुणांची लग्न खोळंबली आहेत. हेच हेरून या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावलाय. त्यामुळे या टोळीला चांगलाच धडा शिकवायला हवा.