Beed Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टाचा धक्का! विनंती अर्ज फेटाळला

Beed Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टाचा धक्का! विनंती अर्ज फेटाळला

खंडणी प्रकरणात अटक झालेल्या वाल्मिक कराडच्या विनंती अर्जाला केज न्यायालयाने फेटाळले, स्लीप अ‍ॅप्नीया उपचारासाठी मदतनीसाची मागणी केली होती.
Published by :
Prachi Nate
Published on

बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यादरम्यान राजकीयवर्तुळात खळबळ माजली होती. वाल्मिक कराड याला दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. केज सत्र न्यायालयात वाल्मिक कराडकडून उपचारबाबत विनंती अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. आपल्याला स्लीप अ‍ॅप्नीया नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिक कराडने अर्जात केला आहे.

मात्र केज न्यायालयात केलेला हा विनंती अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. त्यावर आज सुनावणी झाली. आपल्याला स्लीप अ‍ॅप्नीया नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिक कराडने अर्जात केला आहे. मात्र केज न्यायालयात केलेला हा विनंती अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला कोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. खंडणी प्रकरणात सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मीक कराड याने केज न्यायालयात विनंती अर्ज केला होता.

या अर्जात खाजगी मदतनीसची मागणी केली गेली होती. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. सदरील अर्ज फेटाळला असला तरी शासकीय सुविधा माञ कराडला मिळणार आहेत. वाल्मीक कराड याला स्लीप एपनिया हा आजार आहे. आणि यासाठी मशीन हाताळण्यासाठी त्याने मदतनीसाची मागणी केली होती. रोहित कांबळे यांना सदर मशीन चालवण्याचा अनुभव असल्याने त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे सदरची मशीन रोहित कांबळे हेच चालू शकतात असं या अर्जात म्हटले गेले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com