ताज्या बातम्या
Video : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला; अनेक अधिकारी व पोलीस कर्मचारी जखमी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रत्नागिरी दौऱ्यात एक घटना घडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रत्नागिरी दौऱ्यात एक घटना घडली. संगमेश्वर तालुक्यातील सरदेसाई वाड्याची पाहणी करत असताना त्यांच्या ताफ्यावर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. या घटनेत काही पोलीस व अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी गाड्यांमध्ये धाव घेतली तर काहींनी चेहरा झाकण्यासाठी गमछ्याचा वापर केला. हाताने मधमाशांना झटकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने, अजित पवार या हल्ल्यात सुरक्षित राहिले आहेत. त्यांना तातडीने त्यांच्या गाडीमध्ये बसवण्यात आले.
या गोंधळाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ताफ्यातील सर्व सदस्यांनी गाड्यांमध्ये धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.