यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणारे वाहन झाडाला आदळून अपघात, सहा जणांचा मृत्यू

यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणारे वाहन झाडाला आदळून अपघात, सहा जणांचा मृत्यू

यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वाहननाला अपघात झाला आहे.

यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वाहननाला अपघात झाला आहे. रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर गावातील विठ्ठल देवस्थानाच्या जवळ बुधवारी मध्यरात्री हा अपघात झाला. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने उपचार सुरु असताना प्राण सोडले.

यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी मंदिराकडे पायी निघाले होते. यावेळी संबंधित वाहन चालकाने या भाविकांना जाताना पाहिलं. त्याने गाडी थांबवलं आणि भाविकांना मंदिरापर्यंत सोडतो असं सांगितलं. यानंतर सर्व भाविक गाडीत बसले. परंतु वाहनात बसल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला आणि त्यात सहा जणांनी आपले प्राण गमावले.

अपघातातील मृत भाविक हे रामदुर्ग तालुक्यातील हुल कंद गावाचे रहिवासी होते. हनुमाव्वा (वय 25 वर्षे), दीपा (वय 31 वर्षे), सविता (वय 17 वर्षे), सुप्रीता (वय 11 वर्षे), मारुती (वय 42 वर्षे), इंदिरव्वा (वय 24 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com