Mehul Choksi : 13000 कोटींच्या कथित पंजाब नॅशनल बँक घोटाळा; मेहुल चोक्सीला बेल्जियम कोर्टाचा दणका
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mehul Choksi) 13000 कोटींच्या कथित पंजाब नेशनल बँक घोटाळ्याप्रकरणी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम कोर्टाचा दणका मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने कोर्ट ऑफ कॅसेशनने प्रत्यार्पणाविरोधातील मेहुल चोक्सीची याचिका फेटाळली असून सध्या बेल्जियममध्ये असलेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी 24 ऑगस्ट 2024ला भारताने विनंती केली होती.
बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने मेहुल चोक्सीची याचिका फेटाळल्यानंतर चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. भारताने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती जी अॅन्टवर्प कोर्ट ऑफ अपीलने मान्य केली आहे.
मेहुल चोक्सीने तिथल्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. चोक्सीने प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे त्याने मागणी केली होती की, त्याला भारताकडे सोपवू नये. मात्र, बेल्जियमच्या न्यायालयाने त्याची ही याचिका फेटाळली आहे.
Summery
13000 कोटींच्या कथित पंजाब नेशनल बँक घोटाळा प्रकरण
हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम कोर्टाचा दणका
बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने मेहुल चोक्सीची याचिका फेटाळल्यानंतर चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
