Yashwant Jadhav
Yashwant Jadhavteam Lokshahi

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीशिवाय आणखी दोन नावे!

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

शिवसेना (Shivsena) नेते, मावळत्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापौर पदाचा भावी चेहरा म्हणून पाहिले जाणारे यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आयकर विभागाच्या धाडीमध्ये मिळालेल्या यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये 'मातोश्री' शिवाय अन्य दोघांची नावे आहेत. त्यातील एकाचा उल्लेख केबलमॅन असून दुसरी व्यक्ती महिला असल्याची माहिती मिळत आहे.

गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी आहेत. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी चलाखीने या विषयाला बगल देत डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे म्हटले आहे. आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला, पण दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घराचे नावही ‘मातोश्री’ आहे. त्यामुळे या उत्तरावर आयकर विभागाचे समाधान झाले नसल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com