मुंबईकरांची बेस्ट झाली 75 वर्षांची

मुंबईत उपनगरी रेल्वेनंतर सर्वसामान्यांना बेस्टशिवाय दुसरा पर्याय नाही... 1926 पासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली... बेस्टची पहिली बस 15 जुलै1926 मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली
Published by :
Team Lokshahi

मुंबईत उपनगरी रेल्वेनंतर सर्वसामान्यांना बेस्टशिवाय दुसरा पर्याय नाही... 1926 पासून बेस्टने बस गाड्या चालवायला सुरुवात केली... बेस्टची पहिली बस 15 जुलै1926 मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली... 1947 मध्ये बेस्ट ही मुंबईतील परिवहन सेवा महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली...आज बेस्टला 75 वर्ष पुर्ण होत आहे, जाणून घेऊ या बेस्टच्या वाटचालीचा आढावा...

7 ऑगस्ट 1947 मुंबई मनपाने 9 कोटी 86 लाखांत बेस्ट उपक्रम विकत घेतला. त्यावेळी बेस्टच्या खात्यात फक्त 242 बसेस होत्या. आज ही संख्या 4,500 पेक्षा जास्त झाली आहे. मुंबई मनपाने बेस्ट घेतली तेव्हा तिचा अर्थसंकल्प 6 कोटी 82 लाख होता. 2022-23 वर्षांत 6500 कोटींवर गेला आहे...

2 हजार कोटींच्या तोट्यात असलेल्या बेस्टला फायद्यात आणण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक बसवर भर देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी मिशन 10 हजार उद्दिष्ट ठेवले आहे...

काय आहे मिशन 10 हजार

  • 2026 पर्यंत 1 लाख प्रवाशांमागे 60 बसेस हे गुणोत्तर

  • प्रत्येक थांब्यावर 15 ते 20 मिनिटात बस

  • 175 नवीन मार्गाची आखणी

  • 330 चार्चिंग स्टेशनची निर्मिती

सर्वसामान्यांना अवघ्या 5 ते 10 रुपयांत वातानुकुलित बसमधून प्रवास करण्याचा आनंद देणारी बेस्ट मुंबईकरांसाठी बेस्टच आहे. आता वाढत्या प्रवाशी संख्येच्या तुलनेत सुखदायक प्रवास होण्यासाठी आणि वाहतुकीच्या कोंडीतून पर्याय काढल्यास मुंबईकर खाजगी गाड्यांऐवजी बेस्टनेच प्रवास करतील....

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com