Bhadra Maruti Temple : हनुमान जयंतीनिमित्त भद्रा मारुती मंदिर 28 तास राहणार खुले, 1 हजार पोलीस आणि 40 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

Bhadra Maruti Temple : हनुमान जयंतीनिमित्त भद्रा मारुती मंदिर 28 तास राहणार खुले, 1 हजार पोलीस आणि 40 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिर भाविकांसाठी तब्बल 28 तास सुरू ठेवण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिर भाविकांसाठी तब्बल २८ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. 11 एप्रिल शुक्रवार रात्री 10 वाजता दर्शनासाठी रांगा सुरू होतील, आणि एक किलोमीटर लांब रांगेतून दीड तासात दर्शन मिळेल, असा अंदाज मंदिर संस्थानने व्यक्त केला आहे.

या वर्षी सुमारे 11लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुमारे 1 हजार पोलीस सुरक्षा व्यवस्था पाहणार आहेत. तसेच मंदिर परिसरात 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

शनिवारी (12 एप्रिल) पहाटे 4 वाजता महापूजेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी 6वाजता महाआरती होणार असून, 9 ते 11 दरम्यान ह.भ.प. महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

30 किलो शेंदूराने साकारलेली भद्रा मारुतीची प्रतिकृती हे मंदिराचे खास आकर्षण आहे. 2019 मध्ये 350किलो शेंदूर लेपन काढून त्यातून ही प्रतिमा साकारण्यात आली होती. यंदाही शुक्रवारी सकाळी 10 पासून मध्यरात्री 3 वाजेपर्यंत अभिषेक, शेंदूरलेपन व जन्मोत्सव सोहळा होणार आहे. भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची तयारी पूर्ण झाली असून, भक्तीचा हा महाउत्सव यंदा अधिक भव्य स्वरूपात साजरा होणार आहे.

स्थानीय मार्गात बदल

औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. पायी जाणाऱ्या भाविकांसाठी खुलताबाद नाका ते लहुजी साळवे चौक, स्टार कॉलनी, लहानी आळी, मोठी आळी मार्गे भद्रा मारुती मंदिर मार्ग खुला राहणार आहे. औरंगजेब कबर परिसरात प्रवेश बंद असेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com