"भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात

"भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात

गोंदियात रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला आहे. या अपघातात 50 पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत असे समजते. जखमी प्रवाश्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गोंदियात रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" एक्स्प्रेसला गोंदिया शहरालगत अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, समोर जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला आहे. या अपघातात 50 पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत असे समजते. जखमी प्रवाश्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भगत की कोठी एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेनं जात होती. गोंदिया शहरालगत रेल्वे पोहोचली असता अचानक समोर जात असलेल्या मालगााडीला पाठीमागून रेल्वे धडकली. धडक दिल्यानंतर मोठा आवाज झाला आणि रेल्वेचा एक डब्बा रुळावरून खाली घसरला. पहाटे साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना एकच धक्का बसला. डब्ब्यातील प्रवाशांना मोठा झटका बसला त्यामुळे 50 पेक्षा जास्त जण यात जखमी झाले. सुदैवाने रेल्वेचे वेग जास्त नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या जवानही घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने शासकीय आणि नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com