उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती; भगतसिंग कोश्यारींचा हल्लाबोल
भगतसिंग कोश्यारींनी राज्याच्या राज्यपाल पदावरुन पदमुक्त झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. पहाटेचा शपथविधी हा विषय तर राजकारणात अजून सुरु आहे. यावर प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया देत असतात. भगतसिंग कोश्यारींना यावर विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे माझ्याकडे लिस्ट घेऊन आले आणि म्हणाले की, आम्ही बहुमत सिद्ध करु. त्यावर मी म्हटले ठिक आहे या शपथ घ्या आणि बहुमत सिद्ध करा.“मी कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही आहे. अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
तसेच उद्धव ठाकरेंविषयी विचारले असता त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरेंनी त्यांची संघटना नीट चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. असे म्हणत कोश्यारींनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.