मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकट्याने लढू द्यावे - भाई जगताप

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकट्याने लढू द्यावे - भाई जगताप

वंचित बहुजन आघाडीने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ८३ जागांवर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

वंचित बहुजन आघाडीने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ८३ जागांवर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. मात्र, आता ठाकरे गटाशी युती झाल्यानंतर ठाकरे गट आमच्यासाठी जितक्या जागा सोडतील, त्या जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवेल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच मल्लिकार्जून खरगे यांच्याशी माझी भेट झाली. त्यावेळी मी त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकट्याने लढू द्यावे, अशी विनंती केली होती. मात्र, मी त्यांना हेसुद्धा सांगितलं की जर याबाबतीत केंद्रीय नेतृत्वाने युतीचा निर्णय घेतला, तर तो निर्णय मला मान्य असेल.

यासोबतच “आज राज्यातील आणि देशातील एकूण परिस्थिती बघता, युतीबाबत महाविकास आघाडी म्हणून काही निर्णय होत असेल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. तसेच “प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत. त्यांची संविधानाशी, लोकशाहीशी बांधिलकी आहे. तसेच आमचीही लोकशाहीशी बांधिलकी आहे. त्यामुळे आम्हाला युतीचा निर्णय मान्य करावाच लागेल” असे भाई जगताप म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com