Bhaiyyaji Joshi : भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण, काय म्हणाले?
घाटरकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल आहे. त्यांच्या त्या वक्तव्यावरून विधानसभेत पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला आहे, त्याचसोबत भैय्याजी जोशी यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांसारख्या अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आता वादग्रस्त वक्तव्यावर भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"माझ्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे"
भैय्याजी जोशी म्हणाले की, "काल घाटकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई ही महाराष्ट्रातील एक आहे. त्यामुळे मुंबईची भाषा मराठी आहे यामध्ये कुठेही कोणत ही दुमत असल्याचं काही कारण नाही. कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही. मुंबईत विविध भाषा बोलणारे लोक राहतात त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी मराठी शिकावं, मराठी समजावं, त्यांनी मराठी बोलाव याचा आग्रह असलाच पाहिजे कारण भाषा प्रत्येक राज्याची ओळख आहे", असं स्पष्टीकरण भैय्याजी जोशी यांनी केलेलं आहे.
नेमक प्रकरण काय ?
घाटरकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले होते की, "मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. मुंबई ही कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा असून वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. जसे की, मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. तसेच गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी आहेत, तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळून येतील. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकता यायला हवं", असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. यावर आता विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.