भानुदास एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमले,ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत

भानुदास एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमले,ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत

उद्यापासून सुरु होणार पैठण नाथषष्ठी उत्सव.
Published by :
Sagar Pradhan

सुरेश वायभट|पैठण: पैठण येथिल नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो पायी दिंड्या पैठणनगरीत दाखल झाल्या. दिंड्यांचे आगमन होताच प्रत्येक दिंडीचे उत्साह पूर्व स्वागत करण्यात आले. शहरातील सर्व रस्ते फुलून गेले.टाळ, मृदंगाचा निनाद व मुखी एकनाथ भानुदास, ज्ञानोबा, तुकोबाच्या जयघोषाने भाविकांनी पैठण शहर दणाणून टाकले.

नाथषष्ठी यात्रेनिमित्त पैठण शहरात विविध खाद्यपदार्थ विक्रेते, रसवंती, पूजेचे साहित्य, खेळणी, मनोरंजनासाठी पाळणे, संसारोपयोगी साहित्याची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे या व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद मिळेल व मोठी उलाढाल होईल अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com