रायगडचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने भरत गोगावले समर्थक आक्रमक

रायगडचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने भरत गोगावले समर्थक आक्रमक

रायगडचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले आहेत. महाडमध्ये शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून निदर्शने केली.
Published by :
shweta walge
Published on

रायगडमधून भरत गोगावले आणि अदिती तटकरे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र या लढाईत अदिती तटकरे यांनी बाजी मारली असून भरत गोगावले यांनी डावलण्यात आले आहे. यावरून भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले आहेत.

पालकमंत्रिपदांची यादी जाहीर झाल्यापासून रायगडच्या महाडमध्ये राडा सुरु झाला आहे. भरत गोगावले यांना डावलल्यावरून महाडमधील शिवसैनिक संतापले आहेत. रात्री उशिरा शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावर उतरुन महामार्ग रोखला. महाड तालुक्यातील नांगलवाडी हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून शिवसैनिकांनी निदर्शने केली. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com