Bharat Jodo Yatra MaharashtraTeam Lokshahi
ताज्या बातम्या
भारत जोडो यात्रेचा राज्यातील सहावा दिवस, हिंगोलीत यात्रेचं कोल्हापूरी स्वागत
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रा हिंगोलीत दाखल झाली असून येथे मोठ्या प्रमाणात राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते हिंगोलीत यात्रेचं स्वागत करणार आहेत.
हिंगोली : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रा हिंगोलीत दाखल झाली असून येथे मोठ्या प्रमाणात राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते हिंगोलीत यात्रेचं स्वागत करणार आहेत.
यात्रेचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूरवरुन दहा हजार नागरिक हिंगोलीत दाखल झाले आहेत. सर्व नागरिक लाल फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत करतील. राहुल गांधी यांना खास कोल्हापुरी कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर यात्रा आज हिंगोली जिल्ह्यातील दाती फाटा येथून कळमनुरीच्या दिशेने निघाली आहे.
राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा अशा 5 जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे.