गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत, हिमाचलमध्ये काँग्रेससोबत चुरशीची लढत

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत, हिमाचलमध्ये काँग्रेससोबत चुरशीची लढत

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड येऊ लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. गुजरात आणि हिमाचल या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची वाटचाल होताना दिसत आहे. पहिल्या अर्ध्या तासातील गुजरातचा कल पाहिला तर भाजप 115 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमध्ये काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे. तर आप 2 जागांवर आघाडीवर आहे.दुसरीकडे, हिमाचल प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर, येथेही भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे. हिमाचलमधील विधानसभेच्या 68 पैकी 18 जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँग्रेसही 18 जागांवर आघाडीवर आहे. 'आप' एकाही जागेवर आघाडीवर नाही.

गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपचे सरकार आहे. गुजरातमध्ये भाजपची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी 2002 मध्ये होती, जेव्हा त्यांनी 182 सदस्यांच्या विधानसभेत 127 जागा जिंकल्या होत्या. गुजरातमध्ये पारंपारिकपणे भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होत असली तरी यावेळी 'आप'ने रिंगणात उतरल्याने तिरंगी झाली आहे. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजात भाजपला मोठा विजय मिळेल, असे म्हटले आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये 1985 पासून कोणत्याही पक्षाने सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकलेल्या नाहीत. या डोंगराळ राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता राहिली तर तो विक्रम ठरेल. हिमाचल प्रदेशच्या एक्झिट पोलनेही भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. एबीपी न्यूज सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपला 33-41 जागा, काँग्रेसला 24-32 जागा, आपला शून्य आणि इतरांना 0-4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com