"लाडक्या बहीणींना फसवलं...", भास्कर जाधवांचा सरकारवर संताप

विधानभवनामध्ये त्यांनी सादर झालेल्या अर्थसंकल्पाबद्दल ताशेरे ओढले आहेत.
Published by :
Team Lokshahi

राज्याचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. मात्र या सरकारवर विरोधकांनी ताशेरे ओढले आहेत. उद्धव ठाकरे यांनी सादर झालेल्या अर्थसंकल्पाबद्दल भाष्य केले आहे. विधानभवनामध्ये त्यांनी सादर झालेल्या अर्थसंकल्पाबद्दल ताशेरे ओढले आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल आश्वासनंदेऊनदेखील सरकारला ती पूर्ण करु शकत नाही.

भास्कर जाधव म्हणाले की, "तीन महिन्यांपूर्वी यांच्या सरकारने आणलेल्या सगळ्या योजनांना सरकारने आता स्वतःच स्थगिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता यांनी स्थगिती दिली, मुंबईमधील 1400 कोटी रुपयांचे जे कॉन्ट्रॅक्ट काढले त्यासाठी स्थगिती दिली, त्याचप्रमाणे शिवभोजन थाळीलादेखील स्थगिती देण्याच्या विचारात आहेत . त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सरकारला स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः सगळ्यायोजनांना स्थगिती देत आहेत. येत्या काही काळात अनेक योजनांना स्थगिती मिळेल हे बघाच".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com