भाजपासोबत असणार्‍या शिंदे गटाचे काय होईल, याचे उत्तर येणार काळच देईल - भास्कर जाधव

भाजपासोबत असणार्‍या शिंदे गटाचे काय होईल, याचे उत्तर येणार काळच देईल - भास्कर जाधव

भाजपने प्रत्येकवेळी गरजेपुरतेच छोट्या पक्षांना जवळ घेतले. त्यानंतर त्यांचे हाल काय झाले हे प्रत्येकाला माहीत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लक्ष्मीकांत घोणसेपाटील, रत्नागिरी

भाजपने प्रत्येकवेळी गरजेपुरतेच छोट्या पक्षांना जवळ घेतले. त्यानंतर त्यांचे हाल काय झाले हे प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे सध्या भाजपसोबत असणार्‍या शिंदे गटाचे काय होईल, याचे उत्तर येणार काळच देईल असे सांगत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला चिमटा काढला. तसेच छोट्या पक्षांना संपवायचे असा एककलमी कार्यक्रम भाजपकडून चालवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपकडून बलाढ्य शिवसेनेला संपवण्यासाठी प्रयत्न केले गेले; परंतु हा पक्ष संपणारा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक छोट्या नवीन पक्षांना भाजपने जवळ केले. त्यात महादेव जानकार, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांची उदाहरणे देता येतील. या छोट्या पक्षांना जवळ घेतले, ते पक्ष किती वाढले. गरजे पुरताच त्याचा वापर केला जातो. आता शिंदे गटातील किती आमदार भाजपमध्ये जातात हे आताच सांगता येणार नाही. परंतु छोट्या पक्षाची उदहारणे पाहता शिंदे गटाच्या भविष्याचे उत्तर काळच देईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com