पत्रकार परिषदेनंतर भास्कर जाधवांचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत, निशाण्यावर नक्की कोण?
सध्या महाराष्ट्राचे राजकारण खुप अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये भास्कर जाधव हे एकमेव आमदारदेखील ठाकरेंची साथ सोडणार या चर्चेला उधाण आले आहे. मात्र आता भास्कर जाधव यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आला आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांचा व्हॉट्सअप स्टेटसमुळे अनेक चर्चा सुरु आहेत.
म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसच काय तर जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात. संघटना काय आहे आणि कशी घडवता येते याबाबत संदेश देणारा व्हिडिओ स्टेट्स ठेवत भास्कर जाधव यांनी पुन्हा वेधलं लक्ष आहे. आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काल झालेल्या शिवसेनेच्या बैठकीलाही ते गैरहजर होते. मात्र भास्कर जाधव नाराज नसल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार हेच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.. त्याला कारणही तसंच आहे.. क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही. हे माझं दुर्दैव असल्याची खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केलीये आणि चर्चांना उधाण आलं आहे.