भाऊराव कऱ्हाडेंचा ‘टीडीएम’ पुन्हा येतोय हो प्रेक्षकांच्या भेटीला; या दिवशी होणार  पुन्हा एकदा प्रदर्शित

भाऊराव कऱ्हाडेंचा ‘टीडीएम’ पुन्हा येतोय हो प्रेक्षकांच्या भेटीला; या दिवशी होणार पुन्हा एकदा प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांना ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करणारे दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत ओळखले जाते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांना ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करणारे दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत ओळखले जाते. ‘ख्वाडा’ या पहिल्याच चित्रपटातून त्यांनी चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते

25 एप्रिल रोजी टीडीएम हा चित्रपट रिलीज झाला होता.प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत असतानाच चित्रपटाचे थिएटर मिळत नव्हते. शो अचानक रद्द देखील करण्यात आले. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले होते.

आता पुन्हा एकदा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी टीडीएम चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. आता 9 जूनपासून पुन्हा एकदा टीडीएम प्रदर्शित होणार.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com