सिकंदर ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी
Admin

सिकंदर ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी

गेल्या आठवड्यातट सिंकदरने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चा मान मिळवला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गेल्या आठवड्यातट सिंकदरने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील 'विसापूर केसरी'चा मान मिळवला होता. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भीमा केसरी कुस्त्यांचे आयोजन केले होते. राज्यभरातून जवळपास 400 पेक्षा जास्त पैलवानांनी या स्पर्धेसाठी नवे नोंदवली होती. यातील 5 कुस्त्या या महत्वाच्या होत्या.कुस्त्यांची 9 लाखांची बक्षिसे आणि चांदीच्या गदा दिल्या गेल्या. भीमा केसरीसाठी शेवटची लढत ही सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात झाली.

या लढतीत सुरुवातीला भूपेंद्रने सिकंदर याच्यावर आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सिकंदरने आपला खेळ दाखवला आणि भूपेंद्रला चितपट करत 'भीमा केसरी' खिताब आपल्या नावावर केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com