Amit Shah's Arrival in Mumbai : भाजप प्रदेश कार्यालयाचे भूमिपूजन आणि विविध उद्घाटन कार्यक्रम
थोडक्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात ते अनेक राजकीय आणि प्रशासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, राज्यात त्यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भूमिपूजनाला राजकीय दृष्ट्या मोठे महत्त्व आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते अनेक राजकीय आणि प्रशासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, राज्यात त्यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भूमिपूजनाला राजकीय दृष्ट्या मोठे महत्त्व आहे. पक्ष बळकटीकरणासाठी आणि संघटनात्मक कार्याला नवी दिशा देण्यासाठी या इमारतीला विशेष ओळख मिळणार आहे.
याशिवाय, शाह सह्याद्री अतिथीगृहात सुरक्षा आणि प्रशासकीय घडामोडींवरील उच्चस्तरीय बैठकांना उपस्थित राहतील. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, दहशतवादविरोधी उपाययोजना आणि इतर राष्ट्रीय सुरक्षाविषयक मुद्यांवर येथे महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी असतील. समुद्री सुरक्षेसोबतच अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी शहा उद्या अत्याधुनिक मासेमारी करणाऱ्या जहाजांचे उद्घाटन देखील करणार आहेत. जलसंपदा क्षेत्रातील आधुनिकीकरणाला या माध्यमातून गती मिळेल आणि किनारपट्टीवरील मच्छीमारांना नवे रोजगार व तंत्रज्ञानाची साथ मिळणार आहे.
या दौऱ्यात शाह इंडिया मेरीटाईम वीक 2025 चे उद्घाटनही करणार असून, भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने ही मोठी पायरी मानली जाते. अमित शाहा यांच्या एका दिवसाच्या मुंबई दौऱ्याने महायुती, सुरक्षा यंत्रणा आणि समुद्री विकास या तिन्ही क्षेत्रांत नवा वेग येणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. राज्याचे राजकारण आणि प्रशासन या भेटीनंतर कोणत्या दिशेने गती घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

