ताज्या बातम्या
Bhushan Gavai : भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश, उद्या घेणार न्यायमूर्ती पदाची सूत्रे हाती
भूषण गवई नियुक्ती: दिवंगत रामकृष्ण गवई यांचे सुपुत्र भूषण गवई उद्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतील.
केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. उपाख्य रामकृष्ण गवई यांचे ज्येष्ठ सुपुत्र भूषण गवई यांची भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गवई मुळचे अमरावतीचे रहिवासी आहेत, ते उद्या म्हणजे 14 मे रोजी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतील आहेत.
न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी होते. त्यांनी अमरावतीचे खासदारपद व पुढे बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपालपद भूषवले