राज्य सरकारचा आंतरधर्मीय विवाहाबाबत मोठा निर्णय

राज्य सरकारचा आंतरधर्मीय विवाहाबाबत मोठा निर्णय

श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून आंतरधर्मीय विवाहाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून आंतरधर्मीय विवाहाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमण्यात आली आहे. आंतरधर्मीय व आंतरजातीय नोंदणीकृत विवाह, अनोंदणीकृत विवाह, पळून केलेले आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह यांची संपूर्ण माहिती ठेवण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. ही समिती अशा मुलींच्या पालकांना तसेच मुलींना भेटून त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणणार आहे.

मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही 13 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीवर सदस्य म्हणून महिला व बालविकास विभाग प्रधान सचिव, आयुक्त, सहसचिव, अॅड योगेश देशपांडे, संजीव जैन, सुजाता जोशी, अॅड प्रकाश साळसिंगिकर, यदू गौडिया, मीराताई कडबे, शुभदा कामत, योगिता साळवी यांच्यासह महिला व बालविकास आयुक्तालयाचे उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलींची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेऊन त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी या समन्वय समितीची असणार आहे. संबंधित मुली किंवा त्यांचे कुटुंबीय जर समन्वयासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन देखील या समितीमार्फत केले जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com