Devendra Fadnavis : भाजप शिवसेनेचा युतीबाबत मोठा निर्णय, निवडणूक जाहीर होताच फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis : भाजप शिवसेनेचा युतीबाबत मोठा निर्णय, निवडणूक जाहीर होताच फडणवीसांची घोषणा

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची आज अधिकृत घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक रणधुमाळी सुरू होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीबाबत मोठी आणि निर्णायक भूमिका जाहीर केली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची आज अधिकृत घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक रणधुमाळी सुरू होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीबाबत मोठी आणि निर्णायक भूमिका जाहीर केली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत विधानसभेला पाहायला मिळाली असली, तरी महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणांनुसार निर्णय घेतले जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने, या दोन्ही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस थेट एकमेकांविरोधात लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप–राष्ट्रवादी एकत्र लढल्यास विरोधकांना फायदा होईल, या रणनीतीतून हा निर्णय घेतल्याचं फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाणे आणि राज्याची आर्थिक राजधानी मुंबई येथे मात्र भाजप–शिवसेना महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप–शिवसेना आमने-सामने आले होते आणि दोन्ही बाजूंनी जहरी आरोप-प्रत्यारोप झाले होते. मात्र आता महापालिका निवडणुकांसाठी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com