Devendra Fadnavis : भाजपच्या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकांबाबत मोठा निर्णय, काय म्हणाले फडणवीस?
थोडक्यात
भाजपच्या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकांबाबत मोठा निर्णय
या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार का?
सर्व अधिकार आम्ही जिल्हा पातळीवर दिले आहेत
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज भाजपची पश्चिम विभाग आढावा बैठक पार पडली, या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेण्यात आला, या बैठकी संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
त्या -त्या विभागातल्या पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेत आहोत. आज पश्चिम महाराष्ट्राचा आढावा आम्ही पुण्यामध्ये घेतला. त्यानंतर आम्ही कोकण विभागाचा आढावा मुंबईमध्ये घेणार आहोत. या आढाव्यामध्ये मागच्या वेळी काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे, याचा आम्ही आढावा घेतो. युतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे, याचा आढावा आम्ही घेतो, त्यांच्या अडचणी काय आहेत? ते आम्ही समजून घेतो. आणि पक्षाची संघटना म्हणून बूथची रचना असेल पक्षाचं संघटन असेल, अशा सगळ्या गोष्टींसंदर्भात चर्चा करून पुढचे दिशा निर्देश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आजच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यामध्ये आमचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि सगळे माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, असे सगळे वेगवेगळे लोक एकत्रित होते. एका-एका जिल्हाचा आम्ही आढावा घेतला आहे, अतिशय सकारात्मक परिस्थिती आम्हाला पहायला मिळत आहे. उत्साह आहे. युतीच्या संदर्भात देखील आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहेत, त्या संदर्भातील सर्व अधिकार आम्ही जिल्हा पातळीवर दिले आहेत, आणि आम्ही असं देखील सांगितलं आहे की, जिथे शक्यता असेल तिथे प्रत्येक ठिकाणी युतीचा प्रयत्न केला पाहिजे. काही ठिकाणी युती शक्यत होणार नाही, तिथे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू, पण जरी स्वतंत्र लढलो तरी मित्र पक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा प्रकारचे निर्देश आम्ही त्या ठिकाणी दिले आहेत. त्यामुळे त्या -त्या ठिकाणीची परिस्थिती पाहून त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.