ताज्या बातम्या
Nagpur News : नागपुरात दारुगोळा कंपनीमध्ये मोठा स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू
नागपूरमध्ये काटोल तालुक्यातील कोथलवड्डी परिसरात दारुगोळा कंपनीमध्ये भीषण स्फोट; २ कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी. आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु.
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काटोस तालुक्यातील कोथलवड्डी परिसरामध्ये दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला. एसबीएल एनजी कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे.
काटोल तालुक्यातील कोथलवड्डी परिसरातील डोरली या गावाजवळ ही घटना घडली. एशियन फायर वर्क कंपनीमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार जखमी झाले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
२ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप मृतांची आकडेवाडी समोर आली नाही. या स्फोटमध्ये कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून आगीला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. शरदचंद्र पवार गटाचे नेते सलील देशमुख हे घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करत आहे.