Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. गॅलेक्सी रुग्णालयाच्या बाहेर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध केल्याच्या रागातून डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला मराठा आंदोलकांनी काळे फासले होते. आधी त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासले.

याच पार्श्वभूमीवर वादग्रस्त कृत्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com