Delhi Blast
Delhi Blast

Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणी मोठी माहिती समोर; बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्फोट घडवला?

नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Delhi Blast ) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या. या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले.

लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.

बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 2016 मध्ये हिज्बुल कमांडर बुरहान वानीला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या प्रदर्शनात उमरने सक्रिय सहभाग घेतला होता. तो वानीच्या मृत्यूचा बदला घेण्याबाबतही बोलत असल्याची माहिती मिळत आहे.

Delhi Blast
Delhi Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणी अपडेट समोर; 2019 पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश?

Summery

  • दिल्ली स्फोट प्रकरणी मोठी अपडेट समोर

  • बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्फोट घडवला?

  • डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com