Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादेत मनसेला मोठा धक्का

1 मे रोजी होणार आहे राज ठाकरे यांची संभाजीनगरमध्ये सभा
Published by :
Vikrant Shinde

मागचे अनेक दिवस राज्याच्या राजकीय (Maharashtra Politics) चर्चांचे केंद्रस्थान बनलेल्या मनसेला (Aurangabad MNS) आता मोठा धक्का बसला आहे. 1 मो रोजी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच मनसेचे औरंगाबाद जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख असलेल्या सुहास दशरथे (Suhas Dashrathe MNS) यांनी मनसेला राम राम ठोकला आहे.

Raj Thackeray
मनसे-भाजप युती होणार? संदीप देशपांडे म्हणाले…

सुहास दशरथे हे औरंगाबादेतील मनसेची धडधडती तोफ व आक्रमक नेतृत्त्व म्हणून ओळखले जात. त्यामुळे, सुहास दशरथे ह्यांच्या एक्झिटने मनसेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, सुहास दशरथे हे आज भाजपमध्ये (BJP) पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामूळे, भाजप-मनसेची युती (BJP-MNS Alliance) होऊ शकते अश्या प्रकारच्या चर्चांवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com