Delhi Blast : मोठी बातमी! दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारचा मोठा स्फोट; 8 जणांचा मृत्यू

Delhi Blast : मोठी बातमी! दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारचा मोठा स्फोट; 8 जणांचा मृत्यू

राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

देशाची राजधानी दिल्ली हादरली आहे. दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये मोठा स्फोट झाला हा स्फोट एवढा मोठा होता की, लाल जैन मंदिर आणि दुकानांच्या काचाही फुटल्या. ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त 800 मिटर अंतरावर आहे. त्यामुळे या स्फोटाकडे संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार गेले काही तास लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यामागचं कारण काय याचा तपास केला जात आहे. लाल किल्ल्याचा हा परिसर म्हणजे नेहमीच गजबजलेला असतो.

विशेषतः सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. अशावेळी हा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. दरम्यान गेल्या चार दिवसात, 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली पोलिसांनी कारवाई करत काही संशयितांना पकडले आहे. प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी कारमध्ये हा स्फोट झाला असून यात आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. दरम्यान मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. फोस्टाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

त्यामध्ये आयसिसच्या चार दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकंही जप्त करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटामुळे संशय अधिक बळावला आहे. स्फोट झाल्यानंतर काही काळासाठी येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एनएसजी आणि एनआयएचे पथक घटनास्थळी दाखल. त्याचसोबत बॉम्ब स्कॉडच पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच एनएनजीसी रुग्णालयात जखमी आणि मृतांना दाखल करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com