Imran Khan
Imran KhanTeam Lokshahi

मोठी बातमी! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Published by :
shweta walge
Published on

पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इम्रान खान यांच्या ताफ्यावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारातून इम्रान खान जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे. वजीराबाद येथील जफर अली खान चौकाजवळ हा गोळीबार झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली आहे.

इम्रान खान यांच्या पक्षाची रॅली पाकिस्तानच्या गुजराँवाला येथे काढण्यात आली होती. या रॅलीत इम्रान खान देखील सहभागी झाले होते. या रॅलीत अचानक काही हल्लेखोर घुसले आणि त्यांनी जवळपास सहा ते सात राऊंड फायर केले. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. विशेष म्हणजे जखमींमध्ये इम्रान खान देखील असल्याची माहिती मिळत आहेत. इम्रान यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com