ताज्या बातम्या
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा! तब्बल 10 तासांनंतर पहिली लोकल बदलापूर स्टेशनमध्ये
सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी शेवटची लोकल बदलापूर रेल्वे स्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावली होती.
सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी शेवटची लोकल बदलापूर रेल्वे स्थानकाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावली होती. या नंतर सुमारे 7 वाजून 28 मिनिटांनी कल्याण रेल्वे स्थकाकडून बदलापूरकडे लोकल रवाना करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पहिले इंजिन त्या नंतर लोकल रवाना करण्यात आले.
कर्जत कडे जाणारी सायंकाळी 7:00 वाजताची लोकल फलाटावर लावली. बदलापूर रेल्वे स्थानकावर एक ट्रायल रेल्वे इंजिन रवाना करण्यात आले. ह्या रेल्वे इंजिनने रेल्वे ट्रॅकची चाचणी घेतली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष लोकल बदलापूरहून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले.
नागरिक अजूनही संतप्त आहेत. ट्रायल इंजिन आणि लोकलवर पुन्हा दगडफेक होऊ शकते. चाचणीनंतरच लोकलसेवा सुरु करण्यात आली. मुंबई आणि कल्याणहून कर्जतसाठी लोकल रवाना झाले आहेत.