आयकर थकबाकीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून काँग्रेसला मोठा दिलासा...

आयकर थकबाकीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून काँग्रेसला मोठा दिलासा...

लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर आयकर विभागाने काँग्रेसला थकबाकी भरण्यासाठी नोटिस पाठवल्या.
Published by :
Sakshi Patil

लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर आयकर विभागाने काँग्रेसला थकबाकी भरण्यासाठी नोटिस पाठवल्या. या नंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काँग्रेसला मोठा दिलासा देताना, विभागाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, 24 जुलैपर्यंत पक्षाच्या कर मागण्यांवर कोणतीही कारवाई करणार नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार आयकर विभागाचा वापर करून पक्षाला लक्ष्य करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला होता. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, निवडणुका सुरू असल्याने कोणत्याही पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये अशी आयकर विभागाची इच्छा आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आता 24 जुलै रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com