प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; वरळीतील फ्लॅटची जप्ती ईडीकडून रद्द

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; वरळीतील फ्लॅटची जप्ती ईडीकडून रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लॉड्रींग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली असल्याची माहिती मिळत आहे.

जप्त करण्यात आलेल्या सीजे हॉऊस फ्लॅटची किंमत १८० कोटी इतकी आहे. ED ने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते.

गॅगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल बेकायदेशीर व्यहारातून खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सोमवारी याबाबत ईडीने ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचा हवाला देत त्यावरील जप्ती रद्द केल्याचे सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com