पुण्यात मोठा घोटाळा; CBSE शाळांना 12 लाखांमध्ये वाटले प्रमाणपत्र

पुण्यात मोठा घोटाळा; CBSE शाळांना 12 लाखांमध्ये वाटले प्रमाणपत्र

विद्येचे माहेरघर पुण्यात मोठा घोटाळा उघड करण्यात आले आहेत.

विद्येचे माहेरघर पुण्यात मोठा घोटाळा उघड करण्यात आले आहेत. CBSE शाळांना 12 लाखांमध्ये प्रमाणपत्र वाटल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बीएमसीसी रोड, शिवाजीनगर,नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच जे शासनाचे प्रमाणपत्र आहे ते बनावट असल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून दिले जाणारी एनओसी ही टोळी चक्क बारा लाख रुपयांमध्ये सीबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याचं समोर आलं आहे. उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी सांगितले की, काही शाळांमध्ये बनावट स्वरूपाचे प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. या शाळांची माहिती शासनाला दिली असून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com