Bigg Boss Marathi Season 6
Bigg Boss Marathi Season 6 Bigg Boss Marathi Season 6

Bigg Boss Marathi Season 6 : ‘बिग बॉस मराठी’ परतला नव्या जोशात, 11 जानेवारीपासून रंगणार मनोरंजनाचा थरार

मराठी प्रेक्षकांचा आवडता रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ नव्या जोशात परत येत आहे. सहाव्या पर्वाचं खास आकर्षण म्हणजे पुन्हा एकदा अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Bigg Boss Marathi Season 6 : मराठी प्रेक्षकांचा आवडता रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ नव्या जोशात परत येत आहे. सहाव्या पर्वाचं खास आकर्षण म्हणजे पुन्हा एकदा अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. हा थरार 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि JioHotstar वर पाहता येणार आहे.

यंदाचं घर पूर्णपणे वेगळ्या रूपात उभं राहिलं असून खेळाचे नियमही नवे असणार आहेत. प्रत्येक वळणावर धक्का, आव्हान आणि नशीब बदलणारे क्षण पाहायला मिळणार आहेत. तब्बल 100 दिवस चालणाऱ्या या प्रवासात 16 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून, मैत्री, वाद, डावपेच आणि भावनांचा खेळ रंगणार आहे. अखेरीस एकच स्पर्धक विजेतेपदाचा मानकरी ठरणार आहे.

रितेश देशमुख आपल्या मिश्किल, पण ठाम शैलीत स्पर्धकांना मार्गदर्शन करताना दिसतील. त्यांच्या शब्दांत सांगायचं तर, “यंदा कोणतं दार कुणाचं नशीब उघडेल, हे कुणालाच माहीत नाही.” नवीन घर, नवे चेहरे आणि जबरदस्त ड्रामा… ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 प्रेक्षकांसाठी पूर्ण मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com