Bigg Boss Marathi 6 : ‘बार डान्सर स्टेजवर?’ दिपालीच्या शब्दांवर राधा पाटील संतप्त, बिग बॉस घरात तणाव!
‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होताच घरात वातावरण तापायला लागलं आहे. अवघ्या काही तासांतच मतभेद उफाळून आले असून पहिला मोठा वाद थेट दोन नृत्यांगनांमध्ये रंगताना दिसतोय. लावणी कलाकार दिपाली सय्यद आणि सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली राधा पाटील यांच्यात झालेल्या वादाचा प्रोमो सध्या चर्चेत आहे.
नृत्य आणि परंपरेच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा थेट वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचली. दिपालीने लावणीच्या सादरीकरणाबाबत आपली ठाम भूमिका मांडली, तर तिच्या वक्तव्यामुळे राधा दुखावली गेल्याचं स्पष्ट दिसलं. राधानेही शांत न राहता आक्रमक उत्तर देत स्वतःची बाजू ठामपणे मांडली.
अनुभव आणि परंपरेचा आधार घेणारी दिपाली, तर थेट आणि बेधडक बोलणारी राधा – या दोन भिन्न स्वभावांच्या टक्करमुळे घरातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्येही मतभेद दिसून येत आहेत.
हा वाद पुढे किती वाढणार, इतर स्पर्धक कोणाची साथ देणार आणि याचा खेळावर काय परिणाम होणार, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी ६’ रोज रात्री ८ वाजता, कलर्स मराठीवर.
थोडक्यात
‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होताच घरातील वातावरण तापले.
अवघ्या काही तासांतच मतभेद उफाळून आले.
पहिला मोठा वाद दोन नृत्यांगनांमध्ये रंगताना दिसतोय.
वादात सामील आहेत: लावणी कलाकार दिपाली सय्यद आणि सोशल मीडियावर लोकप्रिय राधा पाटील.
या वादाचा प्रोमो सध्या चर्चेत आहे, सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद.

