Chota Pudhari : ‘छोटा पुढारी’चा लग्नाबाबत दिला मोठा खुलासा; व्हिडिओ करत दिली माहिती
(Chota Pudhari) काही दिवसांपूर्वी, बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याच्या अंगाला हळद लावताना दिसत होते, ज्यामुळे अनेकांमध्ये त्याच्या लग्नाबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर छोटा पुढारीने एक नवीन व्हिडीओ शेअर केला आणि यावर खुलासा केला.
घनश्यामने सांगितले की, हळदीचा व्हिडीओ त्याच्या लग्नाचा नाही, तर एक प्रमोशन होता. त्याने स्पष्ट केले की, तो अजून विवाहाच्या निर्णयावर पोहोचलेला नाही. तो म्हणाला, "मी अजून सेटल व्हायचं आहे आणि मुलगी पाहत आहे, पण ती मुलगी स्वभावाने चांगली आणि कुटुंब सांभाळणारी असावी."
त्याने पुढे सांगितले, "माझ्या आई-वडिलांचं मनावर तर लग्न आहे, पण काळजी करू नका, लवकरच तुमच्यासाठी वहिनी आणू. अफवा पसरवू नका, मी अजून बोहल्यावर चढलेलो नाही." घनश्यामने सर्वांना विनंती केली की, तो जो व्हिडीओ पोस्ट केला होता, तो प्रमोशनसाठी होता आणि त्यावर गढूळ अफवा पसरवू नयेत.

