Bigg Boss Marathi 6 : नवे चेहरे, नवे वाद, नवा बिग बॉस! 11 जानेवारीला धमाकेदार प्रीमियर
मराठी प्रेक्षकांचा लाडका रिअॅलिटी शो पुन्हा एकदा धमाल करायला सज्ज झाला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन 11 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून घराघरात पुन्हा एकदा चर्चेचा माहोल रंगणार आहे. भव्य उद्घाटन सोहळ्यात अभिनेता रितेश देशमुख आपल्या हटके अंदाजात शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत.
रितेशच्या मिश्किल शैलीसोबतच कठोर निर्णयांची झलकही यंदा पाहायला मिळणार आहे. नवीन सिझनमध्ये कोण कोण घरात गोंधळ घालणार, हे लवकरच समोर येणार आहे. ग्रँड प्रीमियरमध्ये खास परफॉर्मन्स, ग्लॅमर आणि मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांसाठी तयार आहे.
कलर्स मराठीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चेहरा न दाखवता दिलेल्या स्पर्धकांच्या झलकांनी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. वेगवेगळ्या अंदाजातील एन्ट्री, नृत्य, अदा आणि हटके स्टाइल पाहून चाहते सहभागी कोण असतील याचे अंदाज बांधत आहेत. नवे चेहरे, नवे डावपेच आणि भरपूर ड्रामा असा हा सिझन 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. हा शो जिओ हॉटस्टारवरही उपलब्ध असणार आहे.

