Shiv Thakare Wedding
Shiv Thakare Wedding Shiv Thakare Wedding

Bigg Boss Marathi विजेता शिव ठाकरेने गुपचूप उरकलं लग्न; कोण आहे शिवची नवरी?

Shiv Thakare Wedding : ‘बिग बॉस मराठी’चा पहिला विजेता आणि ‘बिग बॉस हिंदी 16’चा उपविजेता शिव ठाकरे अखेर विवाहबंधनात अडकला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता शिवने लग्न केलं
Published by :
Riddhi Vanne
Published on

Shiv Thakare Wedding : ‘बिग बॉस मराठी’चा पहिला विजेता आणि ‘बिग बॉस हिंदी 16’चा उपविजेता शिव ठाकरे अखेर विवाहबंधनात अडकला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता शिवने लग्न केलं आणि थेट सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये शिव पारंपरिक वेशात मुंडावळ्या बांधलेला दिसतो. त्याच्या शेजारी पत्नी असून तिचा चेहरा मात्र दिसत नाही. सोनेरी साडीत सजलेली ही नववधू पाठमोरी उभी आहे. फोटोसोबत शिवने फक्त “Finally” असं कॅप्शन दिलं आणि चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं.

हा फोटो शेअर होताच तो झपाट्याने व्हायरल झाला. चाहते आणि अनेक कलाकारांनी शिववर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र शिवने पत्नीचं नाव किंवा ओळख अद्याप उघड केलेली नाही. त्यामुळे “शिव ठाकरेची पत्नी कोण?” हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे. आता तिचा चेहरा आणि ओळख कधी समोर येणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com