बिहारमधील एका व्यक्तीने केलं सासूशी लग्न; नेमकं प्रकरण काय?

बिहारमधील एका व्यक्तीने केलं सासूशी लग्न; नेमकं प्रकरण काय?

बिहारमधील एका व्यक्तीने केलं सासूशी लग्न
Published by :
Siddhi Naringrekar

बिहारमधील बांका येथील हीर मोती गावात ही घटना घडली आहे. सिकंदर यादव (जावई) पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्या सासरी राहायला गेला. त्यावेळी त्याची सासू (गीता देवी ) यांच्यावर त्याचे प्रेम झाले. याची कुणकुण त्याचे सासरे दिलेश्वर दर्वे यांना लागली होती.

या सर्व प्रकारचा तपास सासरे दिलेश्वर दर्वे यांनी केला असता त्यांनी सासू आणि जावयाला रंगेहात पकडले. त्यानंतर हा सर्व प्रकार त्यांनी गावच्या पंचायतीसमोर मांडल्या असता जावयाने पंचायतीसमोर कबूल केलं की त्याचं सासूवर प्रेम आहे. त्यानंतर सासऱ्यांनीच त्यांचा लग्नाला परवानगी दिली आणि गावकऱ्यांसमोरच त्यांचे लग्न झालं.

या लग्नाचे व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यावर कमेंट्स देखील येत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com