Chhagan Bhujbal: भाजपलाही वाटतं की मी त्यांच्यासोबत असावं, भुजबळांचं मोठं विधान

'भाजपलाही वाटतं की मी त्यांच्यासोबत असावं' असं मोठं वक्तव्य देखील भुजबळांनी केलं आहे. भुजबळांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Published by :

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली. भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली. त्यानंतर नेमकं छगन भुजबळ का नाराज झाले, त्यांच्या नाराजीचं कारण समोर आलं आहे.

भाजपलाही वाटतं की मी त्यांच्यासोबत असावं- भुजबळ

अजित पवारांना पहिला पाठिंबा देणारा मीच होतो, स्थापनेपासून पक्षसोबत मीच होतो आणि तरीही मानसन्मानला धक्का लागला तर ते योग्य नाही, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे. तर 'भाजपलाही वाटतं की मी त्यांच्यासोबत असावं' असं मोठं वक्तव्य देखील भुजबळांनी केलं आहे. भुजबळांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीला फक्त लाडक्या बहिणीमुळेच यश मिळालं नाही तर ओबीसी समाजामुळे भरघोस यश मिळालं आहे. ६० ते ७० टक्के ओबीसी समाज हा भाजपकडे असंही भुजबळ यावेळी म्हणाले. भुजबळांनी भाजपबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ओबीसी समाजातील लोकांना निवडून आणलं, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. ते स्वत: म्हणतात आमचा डीएनए ओबीसी आहे. जो राजकीय पक्ष असेल त्याची जी भूमिका असेल त्याप्रमाणे लोकं त्यांच्याबरोबर जातात. ६० ते ७० टक्के ओबीसी समाज हा भाजपकडे झुकलेला आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com