महाराष्ट्रातून २० उमेदवारांची घोषणा, भाजपची दुसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांचं तिकीट कापलं

महाराष्ट्रातून २० उमेदवारांची घोषणा, भाजपची दुसरी यादी जाहीर, 'या' नेत्यांचं तिकीट कापलं

भाजपने नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीसाठी नागपूरमधून उमेदवारी जाहीर केलीय.
Published by :

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आलीय. बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, उत्तर मुंबईतून पीयुष गोयल, रावेरमधून रक्षा खडसे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आलीय. भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवार जाहीर केले आहेत. तर गोपाळ शेट्टी, प्रीतम मुंडे, उन्मेश पाटील, मनोज कोटक यांचा भाजपने पत्ता कट केला आहे. जाणून घ्या उमेदवारांची सविस्तर यादी

महाराष्ट्रातून २० उमेदवार जाहीर

१) नंदुरबार - डॉ. हिना विजयकुमार गावित

२) धुळे - डॉ. सुभाष रामराव भामरे

३) जळगाव - स्मिता वाघ

४) रावेर - रक्षा निखिल खडसे

५) अकोला - अनूप धोत्रे

६) वर्धा - रामदास चंद्रभानजी तडस

७) नागपूर - नितीन गडकरी

८) चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवारट

९) नांदेड - प्रतापराव पाटील चिखलीकर

१०) जालना - रावसाहेब दादाराव दानवे

११) डिंडोरी - डॉ. भारती प्रवीण पवार

१२) भिवंडी - कपिल मोरेश्वर पाटील

१३) मुंबई उत्तर - पियुष गोयल

१४) मुंबई उत्तर पूर्व - मिहिर कोटेचा

१५) पुणे - मुरलीधर किशन मोहोळ

१६) अहमदनगर - डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील

१७) बीड - पंकजा मुंडे

१८) लातूर - सुधाकर तुकाराम श्रृंगारे

१९) माढा - रणजीतसिन्हा निंबाळकर

२०) सांगली - संजयकाका पाटील

इथे पाहा दुसऱ्या यादीतील सर्व उमेदवारांची नावे

bjp second list for loksabha election 2024
bjp second list for loksabha election 2024
bjp second list for loksabha election 2024
bjp second list for loksabha election 2024
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com