chandrakant patil
chandrakant patilTeam Lokshahi

'सत्यजित कदम लढले तर तोंडाला फेस आला, मी लढलो असतो तर...'; चंद्रकांत पाटलांचा टोला

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपला आज पराभव स्विकारावा लागला.
Published by :
Sudhir Kakde

कोल्हापूरच्या पोट निवडणुकीवर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. अखेर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाला. या निकालानंतर आता महाविकास आघाडीतील तिनही पक्षांकडून जोरदार जल्लोष साजरा केला जातो आहे. चंद्रकांतदादा पाटील पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूरची पोटनिवडणूक तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत राहिली असं सांगितलं.

chandrakant patil
सेना-मनसे संघर्ष : राऊतांनी राज ठाकरेंना ओवेसी म्हटल्यावर मनसेने दिले मोठे आव्हान

चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही एकट्याने लढून 77 हजार मतं मिळवली अन् महाविकास आघाडीच्या तोंडाला फेस आणला. निवडणूक असते हार जीत ही होत असते. नागरिकांनी दिलेला मतदारांचा कौल आम्ही मान्य करतो. आम्ही प्रयत्न करण्यात कुठंही कमी पडलो नाही. पैसे, दंडुकेशाही आणि जातीचा वापर या निवडणुकीत महाविकास आघाडीने केला. एवढंच नाही तर माझ्या अंगावर येण्यास देखील हे मागे राहिले नाहीत असा आरोप चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.

दरम्यान, आम्ही या निवडणुकीचं विश्लेषण करू. आम्ही ही निवडणूक विकासावर लढलो. बंटी पाटील म्हणतात की, ही निवडणूक आम्ही धर्मावर नेली, मात्र हिंदुत्व हा आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. राजकीय आवश्यकता म्हणून हिंदुत्व आम्ही वापरत नाही असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. हिंदु धर्मामध्येच सर्वधर्मसमभाव आहे. दुसऱ्या धर्माबद्दल आदर हा फक्त हिंदुनी केला. सत्यजित कदम लढले तर फेस आला, मी लढलो असतो तर काय झालं असतं! मी लढलो नाही त्यामुळे मला हिमालयात जाण्याचा प्रश्न नाही असं म्हणत सतेज पाटील यांनी हुरळून जाण्याचा प्रश्न नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

chandrakant patil
काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी! भाजपला मोठा दणका

शिवसैनिकांच्या मनात असूनही त्यांना भाजपला मदत करता आलं नाही. कारण मुंबईहून अनेक निरीक्षक आले होते. जयश्रीताई यांच्या निमित्तानं एक महिला आमदार झाल्या, त्यांना शुभेच्छा. आम्ही मन मोठं केलं होतं, दोन वेळा आम्ही जयश्री जाधव यांच्याकडे उमेदवारी घेऊन गेलो होतो असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com