Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Team Lokshahi

प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची युती कोणासोबत? बावनकुळे म्हणाले...

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठीच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठीच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात काल मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. महापालिका निवडणुका आणि विधान परिषदेत बहुजन समाजाची मते मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेनेनेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. चर्चेवेळी शिंदे आणि आंबेडकरच होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले की, येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे मोठे नेते येणार आहेत, असा दावा चंद्रशेखर यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पूर्ण पक्ष रिकामा होईल… शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे.. ही सगळी लोक भाजपामध्ये येतील यात बरीच मोठे मोठी नावं आहेत.. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे. प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत, त्यांना सगळं कळतं… उद्धवजी सोन्याच्या चमच्याने बदाम खाऊन मोठे झालेले नेते आहेत.. उद्धवजींच्या रक्तातच युती टिकवणे नाही.. ते कुणाचाच सन्मान ठेऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर उद्धव यांच्यासोबत जाणार नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
शिंदेंनी भाजपाची साथ सोडली तर...; प्रकाश आंबेडकर

यासोबतच बावनकुळे म्हणाले की, द्धवजी सोबत कुणीही राहू शकत नाहीत.. त्यांचे आमदार त्यांच्यासोबत नाहीत… जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत, ते काय प्रकाश आंबेडकर यांना कसे सांभाळतील? असे बावनकुळे म्हणाले आहेत.

Chandrashekhar Bawankule
ठाकरेंसोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com