Sanjay Raut ; 27 फोटो - 5 व्हिडिओ बाहेर काढलं तर भाजपाचं दुकान बंद होईल

Sanjay Raut ; 27 फोटो - 5 व्हिडिओ बाहेर काढलं तर भाजपाचं दुकान बंद होईल

त्या व्यक्तीने सांगावे तो मी नव्हेच. एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले. जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल.
Published by  :
shweta walge

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमधील एक कथित फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन आता राजकारण तापलं आहे. आधी राऊत यांनी फोटो ट्विट करत जुगार खेळल्याचे आरोप केले, तर दुसरीकडे आता भाजपनेही आदित्य ठाकरेंचा फोटो शेअर करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावरच आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत 'तुमचे उद्योग बंद करा नाहीतर सर्व फोटो प्रसिद्ध करेन' असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसचं इशारा देखील दिला आहे.

त्या व्यक्तीने सांगावे तो मी नव्हेच. एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले. जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल. माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ आहेत. मकाऊत जाऊन राज्यातील माणूस साडेतीन कोटी उडवतो. म्हणजे अच्छे दिन आले असावे. नाना पटोलेंच्या भूमिकेशी मी सहमत. तुमचे उद्योग बंद करा नाहीतर सर्व फोटो प्रसिद्ध करेन. महाराष्ट्रात काय चाललं आहे आणि भाजपाचे नेते काय करत आहेत. 27 फोटो काढलं तर भाजपाला दुकान बंद करावं लागेल. प्रति आरोप नको आधी उत्तर द्या. व्यक्तीगत टीका करत नाही पण सुरुवात कुणी केली. आमच्याकडे भान, माणुसकी आहे. बाळासाहेबांचे संस्कार आहेत. मोदी जो ब्रँड पितात तोच आदित्य ठाकरेंकडे. तुम्ही सुरुवात केली आहे आम्ही शेवट करणार. तुमचं महाराष्ट्रात तर आमच मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय. असं संजय राऊत म्हणाले.

ते म्हणाले की, त्या व्यक्तीने सांगावे तो मी नव्हेच. एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले. जेवढं खोटं बोलाल तेवढं फसाल. माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ आहेत. मकाऊत जाऊन राज्यातील माणूस साडेतीन कोटी उडवतो. म्हणजे अच्छे दिन आले असावे. नाना पटोलेंच्या भूमिकेशी मी सहमत. तुमचे उद्योग बंद करा नाहीतर सर्व फोटो प्रसिद्ध करेन. महाराष्ट्रात काय चाललं आहे आणि भाजपाचे नेते काय करत आहेत. 27 फोटो काढलं तर भाजपाला दुकान बंद करावं लागेल. प्रति आरोप नको आधी उत्तर द्या. व्यक्तीगत टीका करत नाही पण सुरुवात कुणी केली. आमच्याकडे भान, माणुसकी आहे. बाळासाहेबांचे संस्कार आहेत. मोदी जो ब्रँड पितात तोच आदित्य ठाकरेंकडे. तुम्ही सुरुवात केली आहे आम्ही शेवट करणार. तुमचं महाराष्ट्रात तर आमच मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय. असं संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com