पुणेकरांच्या कर सवलतीसाठी भाजपाचं शिष्टमंडळ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

पुणेकरांच्या कर सवलतीसाठी भाजपाचं शिष्टमंडळ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

पुणेकरांच्या कर सवलतीसाठी भाजपचं शिष्टमंडळ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी अशी मागणी करत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ,आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

मिळकत करातील ४० टक्के सवलत १/८/२०१९ पासून स्व:वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च १/४/२०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा प्रमुख मागण्या यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com