Dipali Sayyed
Dipali SayyedTeam Lokshahi

Dipali Sayyed यांच्यावर गुन्हा दाखल करा; मोदींविरोधात वक्तव्य केल्यानं भाजप आक्रमक

मुंबईतील खारघर पोलीस स्थानकात भाजपने तक्रार केली आहे.
Published by :
Sudhir Kakde

नवी मुंबई |हर्षल भदाने : दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांच्याविरोधात भाजपने (BJP) खारघर पोलीस स्टेशनमध्ये (Kharghar Police Station) तक्रार दिली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशनमधून हलणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यानंतर खारघर पोलीस स्टेशनबाहेर भाजपने घोषणाबाजी देखील केली आहे. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Dipali Sayyed
राणा दाम्पत्याचं स्वागत जल्लोषात, मात्र कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना नेता दीपाली सय्यद यांच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली असून खारघर पो स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही पो स्टेशन मधून हलणार नाही असं म्हणत खारघर भाजपने पोलीस स्टेशन मध्येच जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. भाजपच्या महिला पदाधिकारींनी दीपाली सय्यद हाय हाय , दीपाली सय्यद वर कारवाई झालीच पाहिजे अश्या घोषणा सुरूच होत्या. खारघर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. तसेच भाजपने दिलेले निवेदन स्वीकारले.

Dipali Sayyed
ब्रिजभूषण सिंह उत्तर प्रदेशचे नाव खराब करत आहेत; उत्तर भारतीयांनीच केली टीका

भाजपनं दिलेल्या निवेदनात नेमकं काय आहे ?

काल दिनांक 28 मे रोजी दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदिंवर आक्षेपार्ह विधान केले होते. मागील पंधरा दिवसांपूर्वीही नरेंद्र मोदी साहेबांची गाडीसुद्धा शिवसैनिकांनी फोडली असती असे विधान सोशल मिडीयावर करून एकप्रकारची खुलेआम धमकी दिली होती. पंतप्रधान हे संविधानिक पद आहे. नरेंद्र मोदी साहेबांचे नेतृत्व राज्याने व देशाने स्विकारले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने या पदाचा सन्मान करणे क्रमप्राप्त आहे. पंतप्रधानांचा अपमान व धमकी म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com